सावेडी : बाजारपेठेतील समस्या सोडवू; पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे आश्वासन | पुढारी

सावेडी : बाजारपेठेतील समस्या सोडवू; पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे आश्वासन

सावेडी; पुढारी वृत्तसेवा : कापड बाजार, मोची गल्ली, जुना कापड बाजार, तेलीखुंट येथील वाहतूक कोंडी, रस्त्यावरील हातगाड्या, बेशिस्त वाहन पार्किंगबाबत लवकरच उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. शहरातील मुख्य बाजारपेठेतील अहमदनगर व्यापारी महासंघ, महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशन, वंदे मातरम युवा प्रतिष्ठान, तसेच गणेश मित्रमंडळाच्या पदाधिकार्‍यांची शुक्रवारी (दि.24) बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी संघटनेचे ईश्वर बोरा, प्रतीक बोगवत, किरण व्होरा, संभव काठेड, चिंटू खंडेलवाल, विजू आहेर, आदित्य गांधी उपस्थित होते.

यादव म्हणाले, कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुख्य बाजारपेठेतील व्यापार्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलिसांचे सहकार्य राहील. बेशिस्त वाहन चालकांना पार्किंगसाठी नियम लावले जातील. तसेच, परिसरात रात्रीच्या वेळी असणारे पेट्रोलिंग दिवसाही वाढविण्यात येईल.

बाजारपेठेतील समस्या सोडविण्यासाठी मुख्य चौकात संघटनेकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. सुरक्षिततेसाठी सिक्युरिटी गार्डची संख्या वाढविली जाईल.

                     – ईश्वर बोरा, अध्यक्ष, कापडबाजार व्यापारी असोसिएशन

Back to top button