उत्तर महाराष्ट्र

नाशिक : हरिहर गडावर अडकलेल्या चौघा युवकांची सुटका

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरिहर गडावर पर्यटनासाठी गेलेल्या मालेगावातील चार युवकांचा गट गडावर अडकल्याचा प्रकार घडला होता. मात्र, ग्रामीण पोलिस, वनखाते व आपत्ती व्यवस्थापन विभागाने बचाव मोहीम राबवून चौघाही युवकांना सुखरूप खाली उतरविले.

फैझान अहमद हिफझुल्ला (19), शोएब युसूफ जमाल (19), शेहेदूद मतिन रहमान (18), मोहम्मद हुजैफ रफिक (19, सर्व रा. मालेगाव) अशी सुटका केलेल्या तरुणांची नावे आहेत. त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्राचे वनरक्षक, वनमजुरांच्या रेस्क्यू पथकाला ही मोहीम यशस्वी करता आल्याचे नाशिक पश्चिम वनविभागाने सांगितले. दरम्यान, शुक्रवारी (दि.16) दुपारी 2 वाजता चौघांनी हरिहर गडावर चढाई करण्यास सुरुवात केली होती. स्थानिकांनी, गडावर जाण्याची वाट धोक्याची असल्याचा इशारा त्यांना पायथ्याशीच दिला होता. मात्र तरीदेखील चौघे गडावर गेले होते. रात्री 9.45 च्या सुमारास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला चौघे युवक अडकल्याचे समजले. त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलिस, त्र्यंबकेश्वर वनविभागाचे पथक, आपत्ती व्यवस्थापनाकडून गिर्यारोहकांचे पथक घटनास्थळी आले. तासाभराच्या मोहिमेत चारही हौशी दुर्गपर्यटकांना सुखरूप पायथ्याशी आणले. मोहिमेत अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, सहायक वनसंरक्षक गणेश झोले, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पवार यांच्यासह अन्य वन, पोलिस कर्मचारी, गिर्यारोहकांचे पथक बचाव मोहिमेत सहभागी झाले होते.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT