उत्तर महाराष्ट्र

नाशिक : पळसेत लम्पी त्वचा रोग शिबिर

अंजली राऊत

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पळसे हनुमान मंदिर सभागृहात लम्पी त्वचा रोग शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोमनाथ चव्हाण यांनी लम्पीविषयी मार्गदर्शन केले. पशुपालकांनी प्रश्नोत्तराव्दारे शंका निरसन करून घेतले. लम्पीचा शिरकाव होऊ नये याकरीता डास गोचिड निर्मूलनासाठी औषधे पशुवैद्यकीय दवाखाना व ग्रामपालिका पळसे यांच्या वतीने उपलब्ध करून देण्याचे सांगण्यात आले. यावेळी सरपंच प्रिया दिलीप गायधनी, प्रतिष्ठित नागरिक बबनराव थेटे तालुकाध्यक्ष गणेश गायधनी आदी उपस्थित होते.

शिबिराप्रसंगी शामराव गायधनी, गणपत गायधनी, यशवंतराव आगळे, भाऊसाहेब जाधव, विलास आगळे, दिलीप गायधनी, होणाजी गायधनी, जयंत गायधनी, भाऊसाहेब चौधरी, रघुनाथ ढेरिंगे, अर्जुन आगळे, मोतीराम तिदमे, भास्करराव गायधनी, अनिल आगळे व परिसरातील शेतकरी व पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष गणेश आगळे, अभिषेक गायखे, कुमार गायधनी, नंदु चव्हाण, श्रीकांत टावरे यांनी मेहनत घेतली. आयोजक तालुकाध्यक्ष गणेश गायधनी यांनी आभार मानले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT