उत्तर महाराष्ट्र

नाशिक : मुक्त विद्यापीठाचा २८ वा दीक्षान्त समारंभ उत्साहात

गणेश सोनवणे

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नवीन शैक्षणिक धोरणात खुल्या आणि दूरस्थ शिक्षण प्रणाली दडलेली आहेत. कोरोना महामारी व त्‍यानंतरच्‍या कालावधीत शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडल्याने दूरस्थ शिक्षण पद्धतीचे महत्त्व वाढले आहे. नवीन शैक्षणिक धोरणात दूरस्थ शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यातूनच मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणाला मागणी वाढणार आहे. स्वयंअध्ययन साहित्य मुक्त विद्यापीठाची खरी ताकद ठरेल, असा विश्वास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. इंद्र मणी यांनी व्यक्त केला.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, भटूप्रसाद पाटील, प्रा. डॉ. जयदीप निकम, प्रा. डॉ. अनिल कुलकर्णी, 'सह्याद्री'चे विलास शिंदे, डॉ. संजय चोरडिया, डॉ. कविता साळुंके, डॉ. प्रवीण घोडेस्वार, प्रा. डॉ. प्रकाश देशमुख, प्रा. डॉ. माधुरी सोनवणे, डॉ. सुनंदा मोरे, प्रमोद बियाणी, डॉ. सज्जन थूल, माधव पळशीकर, सुरेंद्र पाटोळे, डॉ. मधुकर शेवाळे, डॉ. राम ठाकर, डॉ. मनोहर पाटील आदी उपस्थित होते.

स्वयंअध्ययन साहित्याची गुणवत्ता अनेक वेळा सिद्ध झाली आहे. विविध माध्यमांतून विद्यापीठाने स्वत:चा ब्रँड निर्माण केल्याचे डॉ. इंद्र मणी यांनी सांगितले. तर मुक्त विद्यापीठाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शैक्षणिक शिक्षणक्रमांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे कुलगुरू डॉ. पाटील यांनी सांगितले. दरम्यान, विद्यापीठातर्फे पदविकाधारक २४५१८, पदव्युत्तर पदविकाधारक १२, पदवीधारक १ लाख १४ हजार ३२८, पदव्युत्तर पदवीधारक १६३६९, पीएच. डी.धारक ५, तर एम.फिलधारक २ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या.

पारितोषिके प्राप्त विद्यार्थी

सुवर्णपदके : समीर तिवाडे (गडचिरोली), योगिता पाटील (जळगाव), रती सुलेगाव (सोलापूर), स्‍नेहा उघाडे (ठाणे), राहुल मस्‍के (कैज), विजया शेळके (डोंबिवली), सारंग हनेगावकर (नांदेड), राहुल पडवळ (मंचर), नेत्रा महाडिक (मुंबई).

पारितोषिक विजेते विद्यार्थी – मलिकार्जुन भुत्ते (पूर्णा), तुषार पालवे (नगर), राजश्री कुंभार (जालना), यशस्‍वी खिल्‍लारे (दानोली), गजलक्ष्मी आंबे (सांगली), अतुल धांडोळे (सावनेर), विजया शेळके (डोंबिवली), साधना परीट (सांगली), सारिका काळे (पुणे), शीतल पवार (वाटंबारे), सुप्रिया व्‍हंने (सावराज), नेहा सोमलकर (चंद्रपूर), युगंधरा आरेकर (कुरखेडा), प्रगती कमठेवाड (नांदेड), प्रेरणा गुरव (कोल्‍हापूर), संदीप थोरात (टेंभुर्णी), भावना जगताप (नाशिक), ज्ञानेश्‍वर मोरे (जालना), स्‍नेहा उघाडे (ठाणे), प्रभात मेस्‍त्री (रत्‍नागिरी), पीएच.डी. प्राप्त विद्यार्थी- मनीषा खरे, फ्लोरोपिया गोरगिस, माधुरी खर्जुल, दयानंद हत्तीआंबिरे, निशिगंधा पाटील.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT