उत्तर महाराष्ट्र

नाशिक : भर रस्त्यात उघड्या अंगावर चाबकाचे फटके मारून घेत आपचे आंदोलन

गणेश सोनवणे

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा ; नांदगाव येवला रोड दुरुस्तीच्या मागणीसाठी आम आदमीच्या वतीने कार्यकत्यांनी भर रस्त्यात उघड्या अंगावर स्वत:हुन चाबकाचे फटके मारून घेत आंदोलन छेडले. दिड महिन्यात काम पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

यावेळी बोलतांना आप चे जिल्हा उपाध्यक्ष विशाल वडगुले यांनी नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. वडघुले म्हणाले आमदार साहेब तुम्ही व्यापार्यांसोबत पार्टी केली पण तुमच्या पर्यंत नांदगांव येवला रस्ता दुरूस्तीची समस्या का आली नाही ? कदाचित हा रस्ता येवल्याला जातो म्हणून काय? असा सवाल प्रसंगी आमादमीच्या वतीने विद्यमान आमदार सुहास कांदे यांना करण्यात आला.

नांदगांव येवला रस्ता दुरुस्ती संदर्भात आम आदमीच्या कार्यकत्यांनी स्वत:च्या उघड्या अंगावर चाबकाचे फटके मारून घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात आंदोलन छेडले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा उपाध्यक्ष विशाल वडगुले यांनी केले. त्यांच्या सोबत माजी नगरसेवक यशवंत शिंदे यांनी देखील उघड्या अंगावर चाबकाचे फटके मारून घेत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. बाजार समिती प्रवेशव्दारा समोर भररस्त्यात हे आंदोलन करण्यात आले.

आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष विशाल शिवाजी वडघुले, यंशवत शिदें, बिरू शिदें, निलेश पगार, विकास गवळी, स्वभिमानी शेतकरी संघटना ता. अध्यक्ष निलेश चव्हाण, योगेश वाघ, आबादास मोरे, प्रमोद पगार, रविंद्र शिदें, भाऊराव बरसाले, ज्ञानेश्वर भामरे, भसरे आजय, विनोद ठाकरे, जगंधिश औशिकर, अमोल कुमावत, आतुल पाटील, ज्ञानेश्वर वडघुले, बाळासाहेब सावळ, आन्नाभाऊ साबारे, साईनाथ वडघुले, सोमनाथ सोळसे, राजेद्र पाटील,  दत्तात्रय आहेर, गणेश पारख, कमलेश पारख, किशोर ललवाणी, बाजिराव बेडके, चेतन कोचर, संभाजी हिरे, लखन ठाकरे, सुनिल सोमासे, आशिष साळुंखे, लकी कदम, गणेश कोमदकर व आदींनी आंदोलनात भाग घेतला. सा बा चे कनिष्ठ अभियंता एस. पी. निकम यांनी दिड महिन्यात रस्ता दुरुती करु असे लेखी आश्वासन दिले नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT