पालकांकडे फी साठी शाळांचा तगादा सुरुच | पुढारी

पालकांकडे फी साठी शाळांचा तगादा सुरुच

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये कोरोना महामारीमुळे राज्य शासनाने सर्व माध्यमांच्या खासगी शाळांना 15 टक्के फी कपात करण्याचे आदेश दिले होते. मात्र, शाळांनी त्याची वरवर अमंलबजावणी करत आहोत, असे दाखवून पालकांकडे पूर्ण फी भरण्याचा तगादा लावत आहेत.

गेल्या वर्षी कोरोना महामारीमुळे अनेक नागरिक बेरोजगार झाले आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना शहरातील काही खासगी शाळांकडून पालकांना शंभर टक्के फी साठी तगादा लावला जात आहे.

नाशिक : अन् मंत्री छगन भुजबळ धावले मदतीला

यासाठी शाळेतील पालकांनी मोर्चे आणि आंदोलने करुन 50 टक्के फी कपातीची मागणी केली होती. अशा परिस्थितीत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व शाळांनी शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये पालकांना फी मध्ये 15 टक्के सवलत द्यावी, असे परिपत्रक काढले होते.

सर्व माध्यमांच्या शाळांना शालेय शुल्कामध्ये 15 टक्के कपात करण्याचा शासन निर्णय पारित झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महापलिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळांना 2021-22 शैक्षणिक वषार्ंसाठी एकूण फी मध्ये 15 टक्के कपात करावी, असे परिपत्रक पाठविण्यात आले होते.

Body Shaming : हरनाज संधूने रॅम्पवर पाऊल ठेवताच सुरू झाल्या चर्चा

इंग्रजी शाळांच्या फी मध्ये कपात करण्याच्या शासनाच्या निर्णयाबाबत महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) च्या वतीने औरंगाबाद खंडपीठात आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. सरसकट 15 टक्के फी कपातीच्या निर्णयास मेस्टाने विरोध केला आहे. कोरोनामुळे सतत लॉकडाउनमुळे पालक फी भरण्यास हतबल आहेत.

गेल्या वर्षी शहरातील सर्व खासगी व महापालिका शाळा मार्च 2020 ते 2021 याकाळात पूर्णपणे बंद होत्या. त्यामुळे शाळांचा खर्च कमी झाला आहे म्हणून शाळांनी देखील फक्त ट्युशन फी घ्यावी,

सोनिया गांधी यांच्या ‘मनरेगा’ प्रश्नावरून लोकसभेत गदारोळ

असे पालकांचे म्हणने होतेे. तरीही यावर्षी शाळा सुरू झाल्यानंतर शाळांनी पुन्हा एकदा पूर्ण शुल्कासाठी पालकांकडे तगादा सुरू केला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे देखील पालकांच्या शाळांविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

या शैक्षणिक वर्षांपासून शाळा ऑफलाइन सुरू झाल्या आहेत. त्यामुळे येथून पुढे पालकांना पूर्ण फी भरावी लागणार आहे. मात्र, गेल्या शैक्षणिक वर्षातील फीमध्ये शासनाच्या जीआरनुसार 15 टक्के सवलत मिळावी, अशी मागणी पालक करत आहेत.

नाशिकरोड करन्सी नोट प्रेस च्या आवारात भीषण आग

मी शैक्षणिक वर्ष 2020-21 ची 15 टक्के फी कपातीनुसार शाळेची 85 टक्के शाळेची फी भरली आहे. तरीदेखील शाळा राहिलेली 15 टक्के फी देखील भरा म्हणून सांगत आहेत. 15 टक्के फी कपात दिली असता आम्ही पूर्ण फी का भरायची?
-दीपक मोरे, पालक

माझ्या मुलांच्या शाळेने 15 टक्के फी कपात दिलेली नाही. पूर्ण फी भरा असे सांगत आहेत. आता फी भरली नाही म्हणून निकाल राखून ठेवला आहे.
-विशाल बावीस्कर, पालक

पुढील ईडीची धाड माझ्यावर असेल, स्वागतासाठी तयार : नाना पटोले

शाळांचा हा पैसा वसूल करण्याचा आतातायीपणा आहे. शाळांना सुप्रीम कोर्टाचे निर्देश मान्य करत नाहीत. शाळा काही संघटना कोर्टात गेल्या असे सांगतात. जरी कोणत्या संघटना शाळेत गेल्या असतील तर त्यावर स्टे आणलेला नाही. पालकांची दिशाभूल करुन त्यांच्याकडून वसूल करण्याचे शाळांचे धोरण आहे.
– जयश्री देशपांडे, संस्थापक, पॅरेन्टस असोसिएशन, पुणे

Back to top button