उत्तर महाराष्ट्र

नाशिक : सामूहिक, वैयक्तिक शेततळ्यांसाठी ऑनलाइन अर्जाची संधी

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फलोत्पादन पिकांसाठी संरक्षित सिंचन व दुष्काळी भागात फलोत्पादन पिकांच्या क्षेत्र विस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने सामूहिक शेततळे व वैयक्तिक शेततळे देण्यात येते. यासाठी इच्छुक शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी केले आहे. योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांनी कृषी विभागाच्या mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत पाण्याचा साठा निर्माण करणे व साठवलेले पाणी झिरपून वाया जाऊ नये तसेच पाणीटंचाईच्या काळात फळबागा जगविण्यासाठी साठविलेल्या पाण्याचा उपयोग होण्याच्या उद्देशाने वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणाची योजना राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शेतकर्‍यांनी स्वखर्चाने किंवा विविध शासकीय योजनांतून शेततळे खोदकाम केल्यास वैयक्तिक शेततळ्याच्या आकारमानानुसार 50 टक्के व सामूहिक शेततळ्यांसाठी 100 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत. तसेच अधिक माहितीकरिता जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही विभागीय सहसंचालक मोहन वाघ यांनी कळविले आहे.

योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे :
फलोत्पादनाच्या नोंदीसह 7/12 उतारा व 8-अ
आधारकार्डची छायांकित प्रत
आधारकार्ड संलग्न बँक पासबुकची छायांकित प्रत
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती संवर्ग प्रमाणपत्राची छायांकित प्रत
पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
हमीपत्र व स्थळपाहणी अहवाल

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT