जगातील सर्वात लहान फूल | पुढारी

जगातील सर्वात लहान फूल

नवी दिल्ली ः जगातील सर्वात लहान फूल कोणते आहे हे माहिती आहे का? या फुलाला ‘वोल्फिया’ असे नाव आहे. पाणवनस्पतीचे हे फूल असून ही फुले चपटी, चमकदार हिरव्या किंवा पिवळ्या रंगांची असतात. त्यांची लांबी 1-1.4 मि.मी., रुंदी – 0.5-1 मि.मी. असते. सर्वात जड फूल 200 पेक्षा अधिक मायक्रोग्रॅमचे असते. वोल्फिया एंगुस्टा’ किंवा ‘अंगुस्ता वोल्फिया’ असे या फुलांना म्हटले जाते. ‘ऑस्ट्रेलियन डकविड’ असे देखील म्हणतात.

हा 9 ते 11 प्रजातींचा एक प्रकार आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या वनस्पती आणि लहान फुले यांचा समावेश आहे. या पाण्यामध्ये तरंगणार्‍या कॉर्नमील क्रंब्ससारख्या दिसणार्‍या पाणवनस्पती आहेत. त्या गोलाकार आहेत, परंतु अंगस्टा सर्वांपेक्षा अरुंद आहे. खूपच लहान असण्याव्यतिरिक्त या वनस्पतीचे अन्य वैशिष्ट देखील आहे. ही तरंगणारी वनस्पती आहे, परंतु त्यांची मुळे नसतात आणि जगातील सर्वात लहान फुलांचा विकास करण्याव्यतिरिक्त, ते अस्तित्त्वात असलेल्या फळांपैकी सर्वात लहान फळ देखील देतात.

 

Back to top button