जळगाव : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पालकमंत्री व स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्रीपदाची जबाबदारी दिल्याने त्यांचे आभार मानून गुलाबराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. चांदसर येथील स्वातंत्र्य सेनानी तथा माजी आ. कै. मुरलीधर गंगाराम पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते.
पालकमंत्री म्हणाले की, शालेय जीवनापासून मुरलीधरन अण्णा यांची राजकीय कारकीर्द जवळून पाहिली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारण करीत असल्याने वैयक्तिक राजकारणापेक्षा विचाराच्या राजकारणाला महत्व देण्यात येते. मी कायम राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात बोलणारा कार्यकर्ता, लढणारा कार्यकर्ता आणि अखेर मलाही माहिती नव्हते की, शरद पवार हेच मला मंत्रीपद देतील. आयुष्यभर मी त्यांच्यावर टीका करीत राहिलो पण या पक्षाने जादू करत एकेक घरापासून योगायोगाने सरकार स्थापन झाले. श्रद्धा आणि निष्ठा व माणसावर प्रेम असेल तर सर्व काही सहज मिळते असे देखील गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.
हेही वाचा :