मनजित महतो www.pudhari.news  
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : निफाडच्या मनजितला गोळाफेकमध्ये सुवर्णपदक

अंजली राऊत

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा

येथील कर्मवीर मोरे महाविद्यालयाचा विद्यार्थी मनजित महतो याने नॅशनल यूथ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत गोळाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले. कर्नाटकातील उडपी येथे झालेल्या ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मनजितकुमार रामेश्वर महतो याने 18 वर्षांखालील गोळाफेक स्पर्धेत 17.25 मीटर गोळाफेक करत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावले. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. मविप्रच्या नाशिक येथील मध्यवर्ती कार्यालयात संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते मनजितला सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय स्तरावर लांब उडीमध्ये यशस्वी सहभाग असलेला खेळाडू भूषण शिंदे याचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे, क्रीडा संचालक चेतन कुंदे, सिनेट सदस्य डॉ. सी. बी. निगळे, प्रा. महेश बनकर, डॉ. प्रवीण ढेपले आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT