नाशिक : पुढारी वृत्तसेवा : राहत्या घरात विष सेवन करून एकाने आत्महत्या केल्याचा प्रकार नानावली परिसरात उघडकीस आला आहे. राजू पांडुरंग ससाणे (४५, रा. फकीरवाडी, नानावली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. राजू यांनी शुक्रवारी (दि.११) राहत्या घरात विष सेवन केल्याचे समोर आले. त्यांना खासगी व तेथून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भद्रकाली पाेलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.