उत्तर महाराष्ट्र

धुळे : शिरपूर तालुक्यातील निमझरी शिवारात दगडाने ठेचून युवकाचा खून

backup backup

धुळे : पुढारी वृत्तसेवा : शिरपूर तालुक्यातील निमझरी शिवारात दगडाने ठेचून 32 वर्षीय तरुणाचा खून केल्याची घटना आज उघडकीस आली. या तरुणाचा खून पूर्ववैमनस्यातून किंवा पैशाच्या देवाणघेवाणीतून झाल्या असावा असा संशय पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी व्यक्त केला आहे . शिरपूर तालुक्यातील निमझरी ते सावरापाडा रोड वर एका लहान नाल्यात हा प्रकार सकाळी निदर्शनास आला. ही बाब पोलीस पाटील जयंताबाई भील यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी तातडीने शिरपूर शहर पोलीस ठाण्याला ही माहिती दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता मयत तरुण हा सावरपाडा गावातील संजय पावरा असल्याचे निष्पन्न झाले. (Nashik)

संजय पावरा हे शिरपूर मधील एका हॉटेलमध्ये काम करत असल्याची बाब देखील पुढे आली आहे. पोलीस पथकाने घटनास्थळी श्वानपथक आणि फॉरेन्सिक विभागाच्या पथकाकडून तपास सुरू केला आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी हा खून पूर्ववैमनस्यातून पैशांच्या व्यवहारातून झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. यासंदर्भात शिरपूर पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रकार दोन किंवा तीन लोकांनी केला असावा असा पोलिसांना संशय आहे. (Nashik)

हेही वाचलतं का?

SCROLL FOR NEXT