उत्तर महाराष्ट्र

नाशिक : मान, छातीवर धारदार शस्त्राने वार करून तरुणाचा खून

गणेश सोनवणे

नाशिक (चांदवड) पुढारी वृत्तसेवा  : जिल्ह्यातील चांदवड शहरापासून जवळ मुंबई-आग्रा महामार्गावरील गोई पुलाखाली 30 वर्षीय अनोळखी तरुणाच्या मान, छातीवर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचा घटना रविवारी (दि. 6) दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात मारेकर्‍यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना पुलाखाली मृतदेह असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी पथकासह धाव घेतली असता हा तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. मृताच्या जखमांवरून त्याचा खून करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच ही घटना दोन दिवसांपूर्वी घडल्याचा अंदाज आहे. खुनाची माहिती समजताच मनमाडचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT