नाशिक : पुढारी वृत्तसेवा : सिटीसेंटर मॉलजवळून चोरट्याने कारमधून ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी (दि. २०) सायंकाळी घडली. संदीप प्रल्हाद गाडे (३१, रा. जयभवानी रोड) यांच्या फिर्यादीनुसार ते सिटीसेंटर मॉल परिसरात गेले होते. त्यावेळी चोरट्याने कारचालकाचे लक्ष विचलीत करून कारमधील लॅपटॉप व आयफोन चोरून नेला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चाेरीची फिर्याद दाखल केली आहे.