नानासाहेब कापडणीस, अमीत कापडणीस  
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : बापलेक खून प्रकरण : पुराव्यांची साखळी पूर्णकरण्यावर पोलिसांचा भर

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : पैशांच्या लोभातून चौघा संशयितांनी नानासाहेब कापडणीस व त्यांचा मुलगा डॉ. अमित कापडणीस यांचा खून केल्याचे पोलिस तपासातून समोर येत आहे. संशयित राहुल जगताप यास कापडणीस यांची कौटुंबिक, आर्थिक व सामाजिक स्थितीची कल्पना असल्याने त्याने इतर संशयितांच्या मदतीने कट रचून दोन खून केल्याचे व त्यानंतरही कापडणीस यांचे शेअर विक्री करून त्यातून आलेल्या पैशांचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे.

पोलिस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार संशयित राहुल जगताप याने कापडणीस कुटुंबीयांची बालपणीच्या ओळखीचा संदर्भ जोडून त्यांच्याशी जवळीक साधण्यास सुरुवात केली. डॉ. अमितसोबत ओळख वाढवण्यासाठी राहुलने इमारतीत वाहनतळाच्या जागेवरून वाद घातल्याचे समजते. त्यातून ओळख करून अमितसोबत जवळीक वाढवली. त्यानंतर कापडणीस कुटुंबीयांची आर्थिक व कौटुंबिक माहिती संकलित करून त्यानंतर इतर तिघा संशयितांच्या मदतीने संपत्ती बळकावण्याचा कट रचला. दोघांचा खून करून शेअर्स विक्री करून त्यातून आलेल्या पैशांचे संशयितांनी वाटप केले. दरम्यान, गंगापूर रोडवरील सावरकरनगर परिसरात सुरू असलेल्या नानासाहेब कापडणीस यांच्या बंगल्याच्या कामकाजाबाबत मोबाइलवर नोटीस आल्यानंतर राहुल जगताप याने संशयित विकास हेमके याच्या मदतीने तेथील सुरक्षारक्षकास हुसकावून लावले. त्यानंतर बंगल्यास पत्र्याचे शेड उभारले. दुहेरी खून केल्यानंतर संशयितांनी एकत्रितरीत्या सहल, मौजमजा केल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे.

पुराव्यांची साखळी

या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी गुन्ह्यातील घटनाक्रम जोडण्यासोबत पुरावे गोळा करण्यावर भर दिला आहे. कापडणीस यांच्या घरातील रक्ताचे डाग, ज्या वाहनातून मृतदेहांची विल्हेवाट लावली तेथील पुरावे, तांत्रिक पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या पुराव्यांच्या आधारे आरोपींना कठोर शिक्षा मिळू शकते, असा विश्वास सरकारवाडा पोलिसांनी वर्तवला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT