उत्तर महाराष्ट्र

नाशिक : मल्टी मॉडेल हब जागेची मनपा, महारेलकडून संयुक्त पाहणी

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पुणे-नाशिक रेल्वेमार्ग, मनपा सिटीलिंक बससेवा आणि प्रस्तावित टायर बेस निओ मेट्रो प्रकल्प या सार्वजनिक वाहतुकीच्या तिन्ही ट्रान्स्पोर्टचे जंक्शन एकाच मल्टी मॉडेल हबमध्ये समाविष्ट करण्यात येणार असून, या प्रकल्पाच्या नाशिकरोड येथील जागेची महापालिका आयुक्तांसह महारेल व मेट्रोच्या अधिकार्‍यांनी संयुक्तरीत्या पाहणी केली.

आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी नाशिकरोड येथील नियोजित मल्टी मॉडेल हबसंबंधित प्रकल्पांबाबत अधिकार्‍यांशी चर्चा केली. निओ मेट्रो, नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे लाइन (महारेल) आणि सिटीलिंक या तिन्ही कंपन्यांचा एकत्रित प्रकल्प साकारला जाणार आहे. पॅसेंजर टर्मिनल, बसडेपो हे मल्टी मॉडेल हबमध्ये असतील. नाशिकरोडला सिन्नर फाट्याजवळ 16 एकरांत प्रकल्प साकारला जाणार आहे. मल्टी मॉडेल हब विकसित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. निओ मेट्रो, महारेल आणि सिटीलिंक या तिन्ही कंपन्यांमध्ये समन्वय असावा आणि एकत्रित नियोजन व्हावे, यादृष्टीने आयुक्तांनी पाहणी करून तिन्ही कंपन्यांच्या अधिकार्‍यांशी संवाद साधला. यावेळी शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, सुनील रौंदळ, उपअभियंता नीलेश साळी, महारेलचे अशोक गरुड, पराग घोलप, महामेट्रोचे विकास नागुलकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT