पिंपरी : पालिकेकडे 152 टन निर्माल्य संकलित

पिंपरी : पालिकेकडे 152 टन निर्माल्य संकलित

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 31 ऑगस्ट 2022 ते 10 सप्टेंबर 2022 या कालावधीत 152 टन निर्माल्य संकलित करण्यात आले. याव्यतिरिक्त प्रभाग क्रमांक 16 मधील मेट्रो गार्डन रावेत आणि प्रभाग क्रमांक 18 ऑक्सिजन पार्क चिंचवड येथे व प्रभाग क्रमांक 22 जोतिबा गार्डन, काळेवाडी या उद्यानात कंपोस्ट पीटमध्ये 12 टन निर्माल्य पाठविण्यात आले आहे असे एकूण 1,52,970 (152 टन) निर्माल्य संकलित केले असल्याची माहिती महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी गणेश देशपांडे यांनी दिली.

निर्माल्य संकलनाची प्रभागनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे
1) अ प्रभाग 7 खेपामधून 26,935 किलो
2) ब प्रभाग 4 खेपामधून 18,585 किलो
3) क प्रभाग 7 खेपामधून 13.475 किलो
4) ड प्रभाग 7 खेपामधून 19,885 किलो
5) ई प्रभाग 3 खेपामधून 14,730 किलो
6) फ प्रभाग 3 खेपामधून 19,390 किलो
7) ग प्रभाग 4 खेपामधून 15,665 किलो
8) ह प्रभाग खेपामधून 12,305 किलो असे एकूण 8 प्रभागांच्या 38 खेपामधून 1,40,970 किलो निर्माल्य जमा झालेले असून, त्यापासून खतनिर्मिती केली जाणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news