उत्तर महाराष्ट्र

नाशिक : ‘हमारा सपना घर और दुकान हो अपना’…. स्वप्न साकारले

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ललित रूंगटा ग्रुपच्या 'अब सब झीरो' या ऑफरचा 25 हजार ग्राहकांनी लाभ घेऊन आपले शॉप आणि फ्लॅट घेण्याचे स्वप्न साकारले आहे. 'हमारा सपना हर नाशिककर का घर और दुकान हो अपना' हे ध्येय समोर ठेवून प्रयत्नशील असणारे ललित रूंगटा ग्रुपने 'अब सब झीरो' ही ऑफर ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली.

ग्राहकांनी त्यास चांगला प्रतिसाद नोंदवित आपले स्वप्न साकार केले. 10 लाखांपर्यंत बचत होऊ शकणार्‍या या ऑफरअंतर्गत तब्बल 25 हजार ग्राहकांनी दसर्‍याचा मुहूर्त साधत आपले स्वप्न साकारले. या ऑफरचे वैशिष्ट्ये म्हणजे रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रॉपर्टी घेताना लागणारे जीएसटी, स्टॅम्प ड्यूटी, इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस, लिफ्ट मेंटेनन्स डिपॉझिट, एमएसईबी चार्जेस, वॉटर चार्जेस, रजिस्ट्रेशन चार्जेस, लिगल चार्जेस, फ्लोअर राईज चार्जेस अशी कोणतीच रक्कम भरावी लागणार नाही. नाशिकमधील प्राइम लोकेशन्स जसे की, गोविंदनगर, इंदिरानगर, गंगापूर रोड, मखमलाबाद, आडगाव येथे रेडीपझेशन रेसिडेन्शियल आणि कमर्शिअल प्रॉपर्टीजचा समावेश असणार आहे. ज्यामध्ये बुकिंग केल्यास 10 लाखांपर्यंत बचत तर होईलच त्यासोबतच प्रकल्पानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या अ‍ॅमेनिटीजचासुद्धा उपभोग घेता येईल. तरी अधिकाधिक ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेऊन आपले स्वप्न साकार करावे, असे आवाहन रूंगटा ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT