उत्तर महाराष्ट्र

नाशिक पिता-पुत्र खून प्रकरण : कापडणीस यांच्या घरातून सापडले महत्त्वाचे धागेदोरे

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नानासाहेब कापडणीस यांच्या वडनेर गेट व पंडित कॉलनी येथील दोन घरांमधून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. यामुळे संशयित राहुल विरोधात पुराव्यांची साखळी करताना पोलिसांना यश येत असल्याचे दिसते आहे.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आणखी एका संशयितास पकडल्याचे समजते. मात्र, त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. कौटुंबिक वादावरील चर्चेतून संशयित राहुल गौतम जगताप (36, रा. पंडित कॉलनी) याने डिसेंबर 2021 मध्ये मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस यांचा खून केला. त्यानंतर आठ दिवसांत नानासाहेब यांची मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने राहुल याने नानासाहेब यांचा मुलगा डॉ. अमित याचा खून केला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संशयित राहुलला अटक केल्यानंतर अनेक घटनांचा उलगडा झाला.

दरम्यान, शनिवारी (दि.26) पोलिसांनी नानासाहेब यांच्या मालकीच्या दोन घरांची तपासणी केली. यावेळी फॉरेन्सिक पथकही सोबत होते. त्यांना या गुन्ह्यातील महत्त्वाचे धागेदोरे सापडल्याने राहुलविरोधातील फास आवळत चालल्याचे चित्र आहे.

दरम्यान, राहुलला इतर तिघांनी मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी एकास ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. तर इतर दोघांच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथक तयार केले असून, एक पथक गोवा येथे तर दुसरे पथक शहरातच संशयितांचा शोध घेत आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT