उत्तर महाराष्ट्र

नाशिक : झेब्रा क्रॉसिंग पुसल्याने पादचार्‍यांची होतेय गैरसोय

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हेल्मेट सक्तीबद्दल नाशिक शहरात कठोर निर्णय घेतले गेले, परंतु शहरातील बर्‍याच सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगचे चिन्ह पुसले गेल्याने सध्या वाहतूक नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे आणि त्यामुळे पायी चालणार्‍यांची कोंडी होताना दिसत आहे .

नाशिक शहरातील विविध भागांतील सिग्नलवर असणारे झेब—ा क्रॉसिंगचे चिन्ह पुसले गेले आहे. त्यात मार्केट यार्ड सिग्नल, तारवालानगर सिग्नल, राजीव गांधी भवन समोरील सिग्नल यांचा समावेश आहे. त्यामुळे पायी रस्ता ओलांडताना नागरिकांची गफलत होत आहे. एवढेच नाही तर काही ठिकाणी सिग्नलवर थांबणारे वाहन हे थेट झेब्रा क्रॉसिंगच्या चिन्हावर थांबत असल्याने वाहतूक नियमांची पायमल्ली होत आहे आणि त्यामुळे नागरिकांनी नेमके करावे तरी काय हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

त्यामुळे प्रशासन व नगरपालिकेला ही विनंती आहे की, तातडीने या विषयावर लक्ष घालून त्यावर तोडगा काढावा. सर्रासपणे झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणार्‍या बहाद्दरांना कायद्याचा चोप द्यावा. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या प्रत्येक व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर जिथे जिथे झेब्रा क्रॉसिंगचे चिन्ह पुसले गेले आहेत, अशा ठिकाणी त्वरित दखल घेऊन ते चिन्ह नव्याने आखले जावे.

रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. लोक सर्रासपणे झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी करत आहेत, तर काही ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगच दिसत नाही.
– किरण देवरे,
नागरिक

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT