दक्षता : इलेक्ट्रिक मोटार का जळते? | पुढारी

दक्षता : इलेक्ट्रिक मोटार का जळते?

मोटार तापून तिच्या वेटोळ्यातील तारेवरचा पापुद्रा जळून वेटोळे काळे पडले की मोटार जळाली असे म्हणतात. मोटार खालील कारणांमुळे जळते. मोटारीवरील तारेचे वेटोेळे पाण्यात बुडणे किंवा ओले होणे.

कमी अश्वशक्तीच्या मोटारीवर त्यापेक्षा जास्त काम करून घेण्याचा म्हणजेच ओव्हर लोड करण्याचा प्रयत्न केल्यास तारेचे वेटोळे जास्त विद्युत प्रवाह घेण्याचा प्रयत्न करते.

उंदीर, पाली, झुरळे, लहान बेडूक मोटारीत शिरल्या, त्यांचा विद्युत वाहक भागाशी स्पर्श झाल्यास तारांमधील विद्युतप्रवाह अनियमित होऊन मोटार जळते.

मोटारीतील धूळ, कचरा जास्त असल्यास ती तापते आणि जळू शकते. मोटारीतील रोटर आणि स्टार्टर एकमेकावर घासले गेल्यास मोटार जळते.

Back to top button