उत्तर महाराष्ट्र

नाशिक : उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध ; जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

गणेश सोनवणे

सिडको : पुढारी वृत्तसेवा
अंबड, सातपूरबरोबरच नाशिक जिल्ह्यातील उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध राहू, असे आश्वासन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले. नाशिकच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आयमाच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली व स्वागत केले. त्यावेळी गंगाथरन डी. बोलत होते. आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, बीओटी चेअरमन धनंजय बेळे, सरचिटणीस ललित बुब, खजिनदार राजेंद्र कोठावदे, सचिव योगिता आहेर आदी उपस्थित होते.

नुकत्याच यशस्वी झालेल्या आयमा इंडेक्स 2022 औद्योगिक प्रदर्शनाची माहिती धनंजय बेळे यांनी जिल्हाधिकार्‍यांना बैठकीत दिली. नाशकात 2010 कोटींची गुंतवणूक आणण्यात आयमाच्या प्रतिनिधींना यश आल्याचे बेळे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. नाशिक-घोटी दरम्यान नवीन औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी जागेचा शोध सुरू असल्याचे एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे. हे काम तातडीने व्हावे आणि जिल्ह्यातील उद्योजकांचे विविध प्रश्न व समस्या सोडवाव्यात, अशी गळ बेळे यांनी घातली.

नाशकात औद्योगिकीकरणासाठी मोठ्या प्रमाणात जागा आरक्षित आहेत. त्याबाबतही बैठक घेऊन माहिती घेतल्यास व त्याच्या भूसंपादनासाठी आदेश दिल्यास व संबंधितांनी त्याकडे लक्ष पुरविल्यास ही जागा उद्योगवाढीसाठी व नवीन गुंतवणुकीसाठी उपलब्ध होऊ शकेल. तसेच नाशिकच्या चुंचाळे शिवारातील शासनाने पांजरापोळला दिलेली सुमारे 1300 एकर जागासुद्धा उद्योगांसाठी हवी आहे. ती उपलब्ध झाल्यास, ती नाशिक शहराचा गेम चेंजर ठरेल. याबाबतही बैठक आयोजित केल्यास उद्योजकांना त्याची मदत होईल, असेही बेळे यांनी जिल्हाधिकार्‍यांबरोबरच्या चर्चेवेळी नमूद केले. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी आयमा प्रतिनिधींना सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनस्तरावरून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT