सांगली : जिल्ह्यात नववर्षाचे उत्साहात स्वागत | पुढारी

सांगली : जिल्ह्यात नववर्षाचे उत्साहात स्वागत

सांगली : पुढारी वृत्तसेवा

चैत्र शुक्ल प्रतिपदेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा हा सण जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. शहरासह घरोघरी गुढी उभारून सण साजरा करण्यात आला.

गेल्या दोन वर्षापासून गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवर्षावर कोरोनाचे संकट होते. निर्बंधांमुळे जनतेला उत्साहात नववर्षाचे स्वागत करता आले नव्हते. सध्या राज्य शासनाने राज्यातील सर्व निर्बंध उठविलेले आहेत. त्यामुळे यावर्षीच्या नववर्षाचे स्वागत जिल्ह्यातील जनतेने गुढी उभारून जल्लेषात स्वागत केले.

गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठेत हार, साखरेची माळ, कडूलिंब पाला, गुढी घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. बाजारपेठेत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी महागाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागल्या. हार 40 ते 50 रुपये, साखरेची माळ 10 ते 15 रुपयांपर्यंत भाव वधारले होते. नववर्षाचे स्वागत करताना अनेक ठिकाणी फेटे, नऊ वारी साडी नेसून तरुणींनी

बुलेटवरून फेरफटका मारला.

तसेच वाहनांचे शोरूम, इलेक्ट्रीक वस्तू विक्री दुकाने, सोने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असल्याचे दिसून आले. गुढीपाडवा मुहूर्त असल्याने नागरिकांनी सोन्याचा भाव 52 हजारावर असताना देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचे दिसून येते.

Back to top button