उत्तर महाराष्ट्र

नाशिक : अतिक्रमणाची तक्रार दिल्याच्या संशयावरून वृद्धास बेदम मारहाण

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; महानगरपालिकेस अतिक्रमणाची तक्रार दिल्याच्या संशयावरून दोघांनी मिळून वृद्धास बेदम मारहाण केल्याची घटना खोडेनगर परिसरात घडली. या प्रकरणी एकनाथ खंडेराव जाधव (६४, रा. खोडेनगर) यांच्या फिर्यादीनुसार शारदा गांगुर्डे व गोरख गांगुर्डे (दोघे रा. खोडेनगर) यांच्याविरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात मारहाणीची फिर्याद दाखल केली आहे.

जाधव यांच्या फिर्यादीनुसार गांगुर्डे यांची पिठाची गिरणी असून, पत्र्याचे शेड मनपा अतिक्रमण विभागाने काढले. मनपाकडे जाधव यांनी तक्रार दिल्याच्या संशयावरून मंगळवारी (दि. ८) सकाळी दाेघांनी मिळून शिवीगाळ करीत जाधव यांना बेदम मारहाण करीत त्यांच्या हाताच्या बोटास गंभीर दुखापत केली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT