देवळाली कॅम्प -जयंतीनिमित्त मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ. एस.एस. काळे समवेत. उपप्राचार्य डी. टी. जाधव, माजी उपप्राचार्या सुनिता आडके, डॉ. स्वाती सिंग आदी. (छाया: उमेश देशमुख)  
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच वंचित घटकांची प्रगती

अंजली राऊत

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरक मानले जाते, त्यांनी दिलेला समतेचा संदेश, वचिंतासाठी दिलेल्या योगदानामुळे आज वचिंत समाजला न्याय मिळतो आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी केले.

देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात भारतरन्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली. त्यावेळी प्राचार्य डॉ एस एस काळे बोलत होते. याप्रसंगी उपप्राचार्य डी.टी. जाधव, माजी उपप्राचार्या सुनिता आडके, डॉ. स्वाती सिंग, आर. जे. निकम, डॉ. जयश्री जाधव, दिनेक कानडे, मंगला सोनवणे आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. एस. एस. काळे पुढे म्हणाले की, आज विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयामध्ये आपल्याला समाजातील उपेक्षित अन वंचित घटक मोठ्या पदावर काम करतांना दिसतो आहे. त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दुरदृष्टीकोन असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य निश्चितच अनमोल असल्याचे सांगीतले. कार्यकमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. डी. टी. जाधव यांनी केले. सुत्रसंचलन आर. जे. निकम यांनी केले. आभार डॉ. जयश्री जाधव यांनी मानले.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT