उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime : सिडकोतून तीन मुलींचे अपहरण, अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

गणेश सोनवणे

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

अंबड पोलिस ठाणे हद्दीतून दोन ठिकाणांहून तीन मुलींचे अज्ञात इसमाने फूस लावून अपहरण केल्याची नोंद अंबड पोलिस ठाण्यात झाली आहे.

अपहरणाचा पहिला प्रकार स्वामीनगर येथे घडला. फिर्यादी यांची मुलगी मंगळवारी (दि.६) दुपारी 3.45 च्या सुमारास स्वामीनगर येथील हनुमान मंदिराजवळ होती. त्यावेळी अज्ञाताने या मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. बराच वेळ होऊनही मुलगी घरी आली नाही म्हणून फिर्यादी यांनी अंबड पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाची तक्रार दिली असून, पुढील तपास पोलिस हवालदार टोपले करीत आहेत.

अपहरणाचा दुसरा प्रकार सावतानगर येथे घडला. फिर्यादी यांच्या दोन मुली सावतानगर येथील घरी असताना अज्ञाताने या मुलींना अज्ञात कारणातून कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत त्यांचे अपहरण केले. हा प्रकार दि. १६ मे ते दि. ७ जून २०२३ या कालावधीत सिडको परिसरात घडला. मुली घरी परतल्या नाहीत म्हणून त्यांच्या पालकांनी अंबड पोलिस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध अपहरणाची फिर्याद दिली असून, पोलिस नाईक शिरवले पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT