नाशिक : पुढारी वृत्तसेवा
इंडिकल असोसिएशनचे सदस्य असलेल्या कन्सलटंट आणि सुपर कन्सलटंट यांची भव्य कन्सलटंट प्रीमियर लिग अर्थात 'सीपीएल-२०२३' क्रिकेट स्पर्धा शुक्रवार (दि.३) पासून महात्मानगर मैदानावर रंगणार आहे. ही स्पर्धा तीन दिवस चालणार असून, रविवारी (दि.५) बक्षीस वितरण सोहळा पार पडणार असल्याची माहिती आयोजक समितीप्रमुख डॉ. अनिरुद्ध भांडारकर, डॉ. नितीन चिताळकर व सेक्रेटरी डॉ. मिलिंद गांगुर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत मेंदू आणि हृदयावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आपल्या हातात चक्क बॅट घेऊन मैदानावर आयपीएलच्या धर्तीवर सीपीएल स्पर्धा होणार आहे. स्पर्धेमध्ये सहा संघ विजेतेपदासाठी भिडणार आहेत. सुमारे १०० डॉक्टर्स या स्पर्धेत सहभागी होत आहेत. खेळाडूंची लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली असून, सर्वसामन्यांचे थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून केले जाणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शाह यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, स्पर्धेत डॉ. भूषण नेमाडे, डॉ. विशाल गुंजाळ, डॉ. आनंद नागरे, डॉ. मयूर पंजाबी, डॉ. प्रणित सोनवणे, डॉ. विशाल सावळे यांचे संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेसाठी डॉ. कपिल पाळेकर, डॉ. सचिन आहेर, डॉ. दिनेश ठाकूर, डॉ. अमोल राजदेव, डॉ. वैभव पवार, डॉ. मुकेश खैरनार, डॉ जितेंद्र पाटील, डॉ. परिमल सोनवणे आदी विशेष मेहनत घेत आहेत.