नगर : बांधकाम पाडण्यास अडविले म्हणून महिलेचा विनयभंग | पुढारी

नगर : बांधकाम पाडण्यास अडविले म्हणून महिलेचा विनयभंग

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जुने बांधकाम पाडण्यास अडविल्याने महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतुर्भूज खानचंदानी, विष्णू खानचंदानी, सनी खानचंदानी (सर्व रा.बोरुडे मळा, बालिकाश्रम रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. बांधकाम पाडण्यास विरोध केल्याने चतुर्भूज याने महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. विष्णू याने महिलेच्या पतीला शिवीगाळ करत मारहाण केली व सनी याने महिलेचा हात ओढून विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.

 

Back to top button