उत्तर महाराष्ट्र

Nashik : निफाडच्या पाऱ्यातील घसरण कायम

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

निफाडच्या पाऱ्यातील घसरण कायम असून सोमवारी (दि. २६) तालुक्यात ६.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील गारठ्यात अधिक वाढ झाली आहे. नाशिकचा पाऱ्यात काहीअंशी वाढ झाली असली, तरी थंडीचा जोर कायम आहे.

उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे निफाडचा पारा ७ अंशांखाली आला आहे. त्यामुळे तालुक्यात थंडीचा कडाका जाणवत असल्याने निफाडवासीय गारठले आहेत. थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटविल्या जात असून, ऊबदार कपड्यांची मदत घेतली जात आहे. तसेच दुभत्या जनावरांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी बळीराजाची लगबग सुरू आहे. दरम्यान, पाऱ्यात झालेल्या लक्षणीय घसरणीचा फटका द्राक्षबागांना बसण्याची भीती आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास वाचविण्यासाठी शेतकरी पहाटे बागांमध्ये धूरफवारणी करत आहेत.

  • डर्मेटॉलॉजी वेगळी वाट

नाशिक शहरात रविवारच्या (दि. २५) तुलनेत पाऱ्यात काहीअंशी वाढ झाली असून, तो १०.२ अंशांवर पोहोचला. मात्र, थंडीचा जोर कायम असून त्यातही पहाटे व रात्रीच्या वेळी गार वाऱ्याचा वेग अधिक असल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. जिल्ह्याच्या अन्य भागांतही थंडीचा जोर कायम असल्याने ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे. येत्या काही दिवसांमध्ये थंडीत वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला जात आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT