सिडको : मुख्य प्रशासक दिपा मुढोळ मुंडे यांना निवेदन देताना आ . सीमा हिरे, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर .राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष नाना महाले आदी ( छाया : राजेद्र शेळके) 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : सिडको कार्यालयातच नागरिकांची कामे होतील – मुख्य प्रशासक दीपा मुंडे

अंजली राऊत

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
सिडको कार्यालयातूनच नागरिकांना परवानगी, ना हरकत पत्र तसेच इतर सुविधा दिल्या जाणार आहेत. सिडकोतील नागरिकांना कामांसाठी कुठेही जावे लागणार नाही. सिडको नाशिक कार्यालयात आठवड्यातून प्रशासक राहतील याचे नियोजन सुरु आहे, अशी माहिती सिडकोचे मुख्य प्रशासक दीपा मुढोळ-मुंडे यांनी दिली. तसेच फ्री होल्डबाबत शासनाशी संपर्क सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. फ्रीहोल्ड बाबत रहिवाशी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी सिडको मुख्य प्रशासकास प्रवेशद्वारावर घेराव व निदर्शने केली.

गेल्या काही दिवसांपासून सिडको कार्यालयाचे स्थलांतर, प्रशासक तसेच कर्मचारी बदल्या आणि कार्यालयात चारच कर्मचारी ठेवल्याने 25 हजार घरे,पाच हजार मोकळी भूखंड या मिळकतधारकांची विविध परवानगींकरता मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे. याबाबत कार्यालयाचे स्थलांतर थांबवा व प्रशासक कायम ठेवा या मागणीसाठी सोमवारी सिडाकोच्या मुख्य प्रशासक दीपा मुठोळ मुंडे यांना घेराव घालण्यात आला. सिडको मुख्य प्रशासक नाशिक सिडको कार्यालयात येणार असल्याची माहिती सिडको परिसरात वार्‍यासारखी पसरतात परिसरातील अनेक नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक राजकीय पक्षाचे विविध पदाधिकारी यांनी सकाळी सिडको कार्यालय गाठले . सिडको कार्यालय येथून स्थलांतरित करू नये याबाबत आग्रह धरला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सिडको कार्यालयासमोरच आंदोलन करत सिडको प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. तर जोरदार घोषणाबाजी करत 'सिडको आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं', कांचन बोधले हाय हाय अशा देखील घोषणा प्रसंगी देण्यात आल्या. या घटनेनंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. सिडको कार्यालयात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.

यावेळी सिडकोचे मुख्य प्रशासक मुढोळ मुंडे यांना आ. सीमा हिरे, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष नाना महाले, माजी नगरसेवक लक्षमण जायभावे, माजी नगरसेवक अँड तानाजी जायभावे, माजी नगरसेवक मामा ठाकरे, माजी नगरसेविका छाया देवांग, संजय भामरे बाळासाहेब गिते देवेंद्र पाटील संतोष सोनपसारे प्रशांत जाधव कैलास चुंभळे अमर वझरे अविनाश पाटील मकरंद सोमवंशी अँड अंजिक्य चुंभळे अमोल नाईक राहुल सोनवणे गणेश पवार विजय पाटील संतोष भुजबळ मिलींद जगताप राहुल गणोरे दिलीप देवांग रमेश उघडे अर्जुन वेताळ देवचंद केदारे आदीना त्यांना निवेदन दिले . या नंतर मुख्य प्रशासक दिपा मुंढे यांनी सर्व पक्षीय नेते व पदाधिकारी समवेत बैठक झाली. यात सिडको कार्यालयातच नागरिकांची सर्व कामे होतील त्यांना इतर शहरात जाण्याची गरज पडणार नाही . तसेच सिडको नाशिक कार्यालयात अजुन कर्मचारी लागतील का तसेच आठवड्यातुन किती दिवस प्रशासक पाहीजे याचे नियोजन सुरु आहे. त्यामुळे सिडकोतील नागरिकांनी घाबरायचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले तसेच सिडको कार्यालय लवकरच ऑन लाईन सुरु करणार आहे . तो पर्यत ऑफ लाईन कामे सुरू असणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी मुख्य प्रशासक मुंढे यांनी प्रकल्प ग्रस्त शेतकरी व त्यांच्या वकीलांसमवेत बैठक घेतली. प्रकल्पग्रस्त यांच्या मागण्या समजावून घेतल्या.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT