उत्तर महाराष्ट्र

नाशिक : पोलिस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न; एकाला अटक करून गुन्हा दाखल

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील अवैध धंदे बंद करावेत, या मागणीसाठी आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या नाशिक जिल्हाध्यक्षाने पोलिस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी एकाला अटक करून त्याच्याविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संतोष प्यारेलाल शर्मा (47, रा. संसरी गाव, देवळाली गाव) असे आत्मदहनाचा प्रयत्न करणार्‍याचे नाव आहे.

सोमवारी (दि. 15) स्वातंत्र्य दिनाच्या वेळी संशयित संतोष शर्मा यांनी पोलिस आयुक्तालयासमोर येऊन स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच धाव घेत शर्मा यांना रोखले. सरकारवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक श्रीकांत महाजन यांच्या फिर्यादीनुसार, सकाळी साडेदहा वाजता संशयित संतोष शर्मा यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. शर्मा यांनी पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करावेत, या मागणीचे निवेदन देत आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना आत्मदहन न करण्याबाबत प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT