नांदगाव : शासकीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार सुहास कांदे. समवेत तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे आदी. (छाया: सचिन बैरागी)
नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा
अस्मानी संकटानंतर त्रस्त झालेल्या पशुपालकांना लम्पी आजाराचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या तसेच आजाराबाबत जनजागृती करण्याचा सुचना, नांदगाव तहसील कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीदरम्यान आमदार कांदे यांनी आधिकारी वर्गास केल्या.
मंगळवार, दि. २० रोजी नांदगाव तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्वच शासकीय विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन आमदार सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी आमदारांनी प्रामुख्याने लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर तसेच तालुक्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत आढावा घेतला. तालुक्यातील पशुधनाबाबत माहिती विचारली असता प्रभारी पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिल रामभाऊ देवकर यांनी तालुक्यातील पशुधना संदर्भात सविस्तर आढावा दिला. तालुक्यात गोवर्ग-६०८८१, म्हैसवर्ग-१३६६२, असे एकूण ७४५४३ पशुधन संख्या असल्याचे डाॅ. देवकर यांनी सांगीतले. सुदैवाने तालुक्यात एकही जनावरे लम्पी आजाराने बाधीत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच ताबडतोब लम्पी लसीची मागणी केली असल्याचे पशुधन आधिकारी यांनी सांगितले. तसेच सध्यस्थितीत तालुक्यातील अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी कर्मचारीवर्गाच्या नियुक्त्या केल्या असून लवकरच याबाबत पंचनाम्याची कारवाई सुरु केली जाणार असल्याचेही तहसीलदार डॉ. सिध्दार्थकुमार मोरे यांनी या बैठकीत सांगितले. आढावा बैठकीस गटविकास आधिकारी गणेश चौधरी, तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटिल, नगरपरिषद मुख्ययाधिकारी विवेक धांडे, तालुका वैद्यकीय आधिकारी संतोष जगताप, शिक्षण विभाग नंदा ठोके, नायब तहसीलदार नितीन गांगुर्डे, प्रमोद मोरे, विस्तार आधिकारी मांडवडे , विजय ढवळे किरण देवरे, सागर हिरे, सुनिल जाधव, भैय्या पगार, भरत पारख यांच्यासह आधिकारी कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
तहसील कार्यालयात सर्व शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत विशेषता लम्पी आजाराबाबत आढावा घेत या संदर्भात चर्चा झाली. नांदगाव तालुक्यात या आजाराचा शिरकाव झाला नसला तरी जनजागृती तसेच पूर्व तैयारीच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असून अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या पंचनामाच्या आदेश देखील यावेळी संबंधित प्रशासनाला दिले आहेत. – सुहास कांदे, आमदार, नांदगाव विधानसभा मतदारसंघ.
हेही वाचा:
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.