उस्‍मानाबाद : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या टेम्‍पो ट्रॅव्हलरने पेट घेतला अन्.. | पुढारी

उस्‍मानाबाद : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या टेम्‍पो ट्रॅव्हलरने पेट घेतला अन्..

उस्‍मानाबाद ; पुढारी वृत्‍तसेवा : उस्मानाबाद शहरातील एका खासगी शाळेतील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलर (क्र.MH39 2418) ने काळा मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी निवासस्थान रोडवर सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास अचानक पेट घेतला. मात्र स्‍थानिक तरुणांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी टळली. या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

या विषयी अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद शहरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरने मारूती मंदिर ते जिल्‍हाधिकारी निवासस्‍थान रोडच्या दरम्‍यान अचानक पेट घेतला. यावेळी प्राथमिक शाळेचे 20 पेक्षा जास्त विद्यार्थी या टेम्‍पो ट्रॅव्हलरमधून प्रवास करत होते. यावेळी स्थानिक तरुणांनी तत्परतेने आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली. यावेळी या स्थानिक तरुणांनी तातडीने मुलांना बाहेर काढल्याने सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत.

या घटनेची माहिती मिळाल्‍यावर पोलिस घटनास्‍थळी दाखल झाले. यावेळी वाहतूक पोलीस, शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी रस्‍त्‍यावर झालेली बघ्‍यांची गर्दी कमी केली. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या या दुर्घटनाग्रस्त वाहनांची कसलीही नोंद आरटीओकडे आढळून आली नसल्याने, घटनास्थळी पोहचलेले आरटीओचे अधिकारीही अचंबित झाले.

हेही वाचा :  

Back to top button