चांदवड,www.pudhari.news 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : चांदवडला भाजप-शिंदे गटाकडून अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध

गणेश सोनवणे

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ चांदवड तालुका भाजप व मित्रपक्ष असलेल्या बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) यांनी येथील गणूर चौफुलीवरील चांदवड – मनमाड राज्यमहामार्गावर उतरत जोरदार निदर्शने केली. यावेळी अजित पवार यांचा जाहीर निषेध करण्यात येऊन तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन देण्यात आले.

छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून ते खरे धर्मवीर आहे. त्यांच्याबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बेतालपणाचे वक्तव्य केल्याने समस्त राज्यातील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे पवारांनी आपले वक्तव्य मागे घेऊन समस्त राज्यातील नागरिकांची जाहीरपणे माफी मागावी. तसेच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा घेण्यात यावा अशी आग्रही मागणी भाजपा व शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय' अशा घोषणा देण्यात येऊन विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा निषेध करण्यात आला.

यावेळी भाजपचे जेष्ठ नेते डॉ. आत्माराम कुंभार्डे, जिल्हा सरचिटणीस भूषण कासलीवाल, तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, योगेश ढोमसे, डॉ. नितीन गांगुर्डे, गीता झाल्टे, प्रशांत ठाकरे, विशाल ललवाणी, शांताराम भवर, महेश खंदारे, वाल्मिक पवार, साईनाथ कोल्हे, विठ्ठल आवारे, किरण बोरसे, श्रीहरी ठाकरे, दीपक ठाकरे, विजय धाकराव, बाळासाहेब वाघ, आत्माराम खताळ, निवृत्ती शिंदे, गणपत ठाकरे, बाजीराव वानखेडे, निलेश काळे, बिटू भोयटे, मुकेश कोतवाल, विनायक हांडगे, डॉ. भाऊराव देवरे, विकास घुले, प्रा. अरुण देवढे आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT