राज्यसभेची अटीतटीची लढत; तेव्हा लक्ष्मण जगताप पीपीए किट घालून विधानसभेत आले... | पुढारी

राज्यसभेची अटीतटीची लढत; तेव्हा लक्ष्मण जगताप पीपीए किट घालून विधानसभेत आले...

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराचे माजी शहराध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं आज सकाळी निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते दुर्धर आजाराने त्रस्त होते. पुण्यातील बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

राजकारणात काम करत असताना अनेक आव्हानांना पेलावे लागते, ते जगताप यांनी दाखवून दिले. आमदार जगताप भाजपसाठी धडाडीचे नेतृत्व, 2017 साली पिंपरीचे शहराध्यक्ष असताना पालिकेत भाजपची सत्ता आणण्यात जगताप यांचा सिहांचा वाटा होता. जेव्हा पक्षाला लक्ष्मण जगताप यांची गरज होती, तेव्हा त्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत पक्षासाठी थेट ॲम्ब्युलन्समधून विधानसभा गाठली होती. निमित्त होत राज्यसभा निवडणुक, १० जून रोजी निवडणुकीसाठी मतदान होतं.

यावेळी पक्षाला आपली गरज असल्याचे त्यांच्या लक्षात येताच जगताप यांनी विधानसभेत येण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडी विरूद्ध भाजप अशी ही अटीतटीची निवडणूक होती. त्यामुळे लक्ष्मण जगताप यांनी त्यांचे बंधू शंकर जगताप यांना सोबत घेऊन विधिमंडळात जात त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या या कामाचं सर्वत्र कौतुक झालं होत. पक्षासाठी त्यांनी निष्ठा पणाला लावली होती. अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारी त्यांची ही कामगिरी त्यावेळी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेचा विषय बनली होती.

Back to top button