उत्तर महाराष्ट्र

नाशिक : पाथर्डी-वडनेर रस्त्यालगत दुचाकी घसरून तरुण ठार

अंजली राऊत

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

इंदिरानगर परिसरात पाथर्डी-वडनेर रस्त्यालगत 35 वर्षीय मद्यधुंद तरुणाचा दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अनिल सदानंद जाधव (35, रा. सातपूर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत जाधव यास दारूचे व्यसन होते. शुक्रवारी (दि. 2) रात्री 1.30 च्या सुमारास घरच्यांना न सांगता आपल्या दुचाकीने (क्र. एमएच १५ डीझेड ८६१६) पाथर्डी फाट्याकडे जाताना दारूच्या नशेत दुचाकीवरून घसरले. त्यात त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे हे पोलिस पथकासह घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT