कारंजाच्या पाण्यावर हॅमिंगबर्डची जलक्रीडा! | पुढारी

कारंजाच्या पाण्यावर हॅमिंगबर्डची जलक्रीडा!

लंडन : सध्या जगालाच कडक उन्हाळ्याने हैराण केले आहे. अशा स्थितीत हॅमिंगबर्डसारख्या चिमुकल्या पक्ष्यांनाही पाण्यात खेळण्याची ओढ लागली आहे. एका हॅमिंगबर्डचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. कारंजाच्या पाण्यावर हा पक्षी जी मौजमस्ती करीत आहे ते पाहून अनेकांच्या जीवाला गारवा वाटत आहे!

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कारंज्यावर एक हमिंगबर्ड पाण्याच्या उडणार्‍या थेंबांवर आरामात उडताना आणि त्याची मजा घेताना दिसत आहे. या पक्ष्याकडे पाहून असं वाटतं की, कारंज्यावर उडणार्‍या पाण्याच्या थेंबांमध्ये उडत ओलं होऊन तो आपलं मन शांत करत आहे. अशा प्रकारे स्वतःला ‘रिफ्रेश करणं’ या पक्ष्याला आवडत आहे. यामुळेच लोक हा व्हिडीओ फक्त बघत नाहीत तर ते एकमेकांसोबत शेअर करतानाही दिसत आहेत.

ट्विटरवर एका अकाऊंटवरून ही क्लिप पोस्ट करण्यात आली आहे. तीस लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं की, ‘मी हा व्हिडीओ सेव्ह करणार आहे, जेणेकरून मला भविष्यातही याचा आनंद घेता येईल.’ दुसर्‍या यूजरने लिहिलं की, ‘पक्ष्यांना त्यांच्या पायात उष्णता जाणवते, ते त्यांचे पाय आणि शरीर भिजवतात. थंड ठेवतात.

Back to top button