उत्तर महाराष्ट्र

नाशिक : रात्री दीडला जाळली दुचाकी, स्फोटाने रहिवाशांत घबराट

गणेश सोनवणे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

आयटीआय पुलानजीकच्या शाहूनगर भागातील वरुबाबानगर या ठिकाणी एका परप्रांतियाची दुचाकी रात्री १.३० च्या सुमारास समाजकंटकांनी जाळली. दुचाकीला आग लावताच तिचा स्फोट झाल्याने परिसरात घबराट पसरली होती.

कैलास सहानी हे भाडेतत्त्वावर राहत असून, रात्री १२ च्या सुमारास काम संपवून घरी आले. काही समाजकंटकानी रात्री १.३० च्या सुमारास त्यांनी घरासमोर पार्क केलेली दुचाकी (एमएच 15, जीसी 5480) पेटविण्यात आली. ती पेटल्यानंतर काही क्षणात तिचा स्फोट झाला. या स्फोटाने शेजारील घराच्या भिंती काळ्या झाल्या. एवढ्या दहशतीवरच न थांबता समाजकंटकांनी काही अंतरावर पार्क केलेली दुचाकी पेटवण्याचा प्रयत्न केला. या दुचाकीचा पेट्रोल पाइप तसेच काही वायरिंग तोडून गाडीचा स्फोट घडविण्याचा प्रयत्न त्यांनी केला, परंतु स्फोट झाला नाही. या प्रकरणी अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT