Delhi CM Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना गोवा पोलिसांकडून समन्स | पुढारी

Delhi CM Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांना गोवा पोलिसांकडून समन्स

पुढारी ऑनलाईन: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना गोव्याच्या पेरनेम पोलिसांकडून समन्स बजावण्यात आला आहे. यानुसार त्यांना २७ एप्रिल रोजी चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. कथित सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गोवा पोलिसांकडून केजरीवाल यांना हे समन्स बजावण्यात आले आहे.

गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी (दि.१३) ही माहिती देण्यात आली. दरम्यान, गोवा पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांनी पोस्टर्स लावून, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button