नाशिक www.pudhari.news 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : गुन्हे शाखेकडून मोबाईल, दुचाकी व जबरी चोरीचे एकूण चार गुन्ह्यांची उकल

अंजली राऊत
नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
मोबाईल, दुचाकी व जबरी चोरीचे गुन्हे उकल करण्यात पंचवटी गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे. यामध्ये एकूण चार गुन्ह्यांची उकल झाली असून चार मोबाईल, एक चाकू, एक ऑटो रिक्षा, एक दुचाकी संशयितांकडून हस्तगत करण्यात आली आहे.
पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी जबरी चोरी, मोबाईल चोरी व दुचाकी चोरी उकल करणेबाबत आदेशित केले होते. तसेच पोलिस उपायुक्त अमोल तांबे सहायक पोलिस आयुक्त गंगाधर सोनवणे यांनी दाखल गुन्ह्याचा आढावा घेत गुन्हे उघडकीस आणण्याकामी मार्गदर्शक सूचना केल्या. त्यानुसार पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी गुन्हे शोधपथक अधिकारी व कर्मचारी यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने योजना आखून मानवी कौशल्याने व तांत्रिक पद्धतीने तपास यंत्रणा राबविली.
त्यानुसार पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दाेघा लुटारुंनी एका पादचाऱ्याशी हुज्जत घालत त्याचे माेबाईल जबरीने पळवून नेल्याच्या घटनेची उकल करण्यात पंचवटी पाेलिसांना यश आले. यातील संशयित सुनील लाशा डगळे (१९, रा. गौरी पटांगण) व नंदू मुन्ना भवर(२५, रा. आव्हाड पेट्रोल पंपाजवळ, पाथर्डी फाटा) यांस ताब्यात घेतले आहे. यांच्याकडून दाेन माेबाईल हस्तगत करण्यात आले. आडगाव नाका येथील गो गॅस पेट्रोल पंपावर सचिन सातभाई काम करीत होता. यावेळी संशयित संदेश उर्फ काळू पगारे व दुर्गेश उर्फ विकी जोझे, विकी शिंदे, निलेश उफाडे हे एम एच १५ झेड- ९६७७ वाहनाव्दारे सचिन सातभाई यांना पंपावर घेऊन गेले. त्यानंतर सचिन यास चाकुचा धाक दाखवुन त्यांच्या खिशातील रोख सात हजार पाचशे पन्नास रूपये काढुन घेतले. तसेच फिर्यादीस मारहाण केली. या प्रकरणी संशयितांना अटक केली असून रोख रक्कम व ऑटो रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे. दत्तू अशोक झाडे (रा. यशवंतनगर, ता. बागलाण) हे पंचवटीतील ड्रीम कॅसल सिग्नल ते चाेपडा लाॅन्स दरम्यानच्या रस्त्यावर धनदाई लाॅन्सजवळ दुचाकीवरून आलेल्या संशयित विनोद झाल्टे व सागर माळी व संतोष खोडे यांनी सोमवारी (दि.२६) मारहाण करत त्यांचे पैसे व मोबाईल लुटून नेला होता. यातील संशयित विनोद व सागर यांना (दि.२८) रोजी ताब्यात घेतले असून एक रेड मी मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. (दि २७) रोजी रात्री दहा वाजता ऋतिक तिवारी, (रा.लामखेडे मळा,दिंडोरीरोड) हा मालेगाव स्टँड येथे असतांना दोन अनोळखी इसमांनी त्यांचेजवळ येवून त्यांना अत्यावश्यक फोन करायचा असे सांगून त्याचा ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन घेऊन संशयित ओम सासे, प्रथमेश अवसरकर हे पसार झाले. संशयितांना गुरूवार (ता.२९) रोजी अटक केली आहे. त्यांचे कडून ओप्पो कंपनीचा मोबाईल हस्तगत केला आहे.तसेच या संशयितांनी भद्रकाली पोलीस ठाणेकडील हद्दीतून हिरो सी.डी.डॉन मोटार सायकल एम एच- १५- ई कियू- ६९७३ चोरी केल्याची कबुली देली असून दुचाकी हस्तगत केली.
"यांनी बजावली कामगिरी" :
पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ सिताराम कोल्हे, पोलिस निरीक्षक गुन्हे युवराज पत्की, पोलिस निरीक्षक प्रशासन रणजित नलावडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार, विलास पडोळकर, पोलिस निरीक्षक प्रविण देवरे, योगेश माळी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाळनाथ ठाकरे, अशोक काकड व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार तसेच काटया मारूती पोलीस चौकीचे बीट मार्शल कर्तव्यावरील पोलिस शिपाई विष्णु जाधव व सागर पांढरे यांनी पार पाडली.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT