संजय राठोड यांना शह देण्यासाठी शिवसेनेची मोठी खेळी, पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांचा शिवसेनेत प्रवेश | पुढारी

संजय राठोड यांना शह देण्यासाठी शिवसेनेची मोठी खेळी, पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : बंजारा समाजाची काशी म्हणून परिचीत असलेल्या पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज यांनी आज (दि. ३०) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हातात बांधले. यावेळी बंजारा समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सुनील महाराज यांच्या प्रवेशामुळे मंत्री संजय राठोड यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करण्यात शिवसेना यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे.

ठाकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आम्ही शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. बंधारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सत्तेत वाटा मिळाण्यासाठी शिवसेनेसोबत जाणे गरजेचे होते. आम्ही सर्व ठाकरे यांच्यासोबत आहोत. निवडणूक लढविण्याबाबत समाज निर्णय घेईल. बंजारा समाजाला केवळ शिवसेना न्याय देऊ शकते, अशी प्रतिक्रिया सुनील महाराज यांनी यावेळी दिली.

पोहरादेवी येथील महंत शिवबंधन बांधणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांमध्ये सुरू होती. दरम्यान, आज महंत सुनील महाराज यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच राज्यभरात सुनील महाराज यांना मानणारा वर्ग सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या

संजय राठोड याच्यावर नाराज असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे सुनील महाराज यांनी यआधी म्हटले होते. शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेले मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी थेट महंतांना शिवबंधन बांधून आखाड्यात उतरवले आहे. मतदारांना शिवसेनेकडे वळती करण्यात त्याबरोबर राज्यात १ लोकसभा, ५ विधानसभा मतदारसंघात बंजारा समाजातील उमेदवार देण्याच्या आश्वासनाने महंत सुनील महाराज यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेऊन हाती शिवबंधन बांधून घेतले आहे.

Back to top button