नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जेलरोड येथील मनपा शाळा क्रमांक ५६ मध्ये किरकोळ करणावरुन शिक्षक चंद्रकांत गायकवाड यांनी कर्ण चांदुडे या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. याप्रकरणी शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी सबंधित शिक्षक व शाळेच्या मुख्यध्यापिका यांना चोवीस तासात खुलासा करा अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा नोटीस जारी केली आहे.
शाळा क्रमांक ५६ मधील शिक्षक चंद्रकांत गायकवाड यांच्या विद्यार्थ्यांकडून यापूर्वी अनेक तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती समोर येत आहे. मंगळवारी (दि.२८) कर्ण व इतर मुलाचे भांडण सुरु होते. ते सोडविण्याऐवजी गायकवाड यांनी कर्ण याला बेदम मारले. अगदी गालावर बोटाचे निशाण उमटेपर्यंत मारले. विशेष म्हणजे मुख्यध्यापिका मोहिते यांच्या दालन आवारात हा प्रकार घडला. हे प्रकरण शिक्षणाधिकारी धनगर यांच्यापर्यंत पोहचताच त्यांनी शिक्षक गायकवाड व मुख्यध्यापिका हेमलता मोहिते यांना याबाबत खुलासा मागितला असून, कारवाई का करु नये? असा जाब विचरला आहे.
मुख्यध्यापिका मोहिते व शिक्षक गायकवाड यांना विद्यार्थी मारहाण प्रकरणी नोटिस बजावली आहे. २४ तासात खुलासा प्राप्त न झाल्यास नियमानूसार कारवाई केली जाईल.
– सुनीता धनगर, शिक्षणाधिकारी
हेही वाचा :