उत्तर महाराष्ट्र

नाशिक : नांदगाव रस्त्यावर पोलिसाचा ट्रॅक्टरच्या धडकेने मृत्यू

अंजली राऊत

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा
येवला-नांदगाव रस्त्यावरील राजापूर गावानजीकच्या पन्हाळ पाटीच्या वळणावर रात्री कार व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन त्यात कारमधील पोलिस कर्मचारी ठार झाला. दीपक पाटील असे मृत पोलिस कर्मचार्‍याचे नाव असून, ते नांदगाव पोलिस ठाण्यात कार्यरत होते. पाटील हे स्विफ्ट कार (एमएच 41, एएस 6887) मधून नांदगावकडून येवल्याकडे जात होते. येवल्याकडून राजापूरच्या दिशेने जाणारा ट्रॅक्टर पन्हाळ पाटी येथे वळणावर असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर जबर धडक झाली. यात कार व ट्रॅक्टरच्या पुढील भागाचा पूर्ण चकनाचूर झाला. पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच नांदगाव व येवला पोलिस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी अपघात झालेले दोन्ही वाहने रस्त्यावरून बाजूला केले व रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT