आरटीई www.pudhari.news 
उत्तर महाराष्ट्र

नाशिक : आरटीई प्रवेश प्रक्रियेतून 271 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रवेश

अंजली राऊत

नाशिक (सिन्नर)  : पुढारी वृत्तसेवा
शिक्षण हक्क कायदा 2009 मधील तरतुदींनुसार आर्थिकदृष्टया दुर्बल व वंचित घटकांतील पाल्यांना शासनमान्य विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यीत शाळांमध्ये 25 टक्के प्रवेश हे राखीव ठेवण्यात येतात. आरटीई (RTE) प्रवेशप्रक्रिया ही पारदर्शी व प्रभावीपणे राबविता यावी, यासाठी संपूर्ण राज्यात एकच वेळी पार पाडली जाते. त्यानुसार तालुक्यातील 31 पात्र शाळांमध्ये सदरची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 271 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार असल्याची माहिती पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने कळविण्यात आली आहे.

तालुक्यातील शासनमान्य विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळांना सदरचे प्रवेश देणे बंधनकरक आहे. या प्रवेशाबाबत प्रवेशस्तर ठरविण्याच्या सूचना संबंधित शाळांना देण्यात आलेल्या आहेत. ज्या शाळा याबाबत प्रवेश देणार नाही त्यांना मान्यता कढण्याबाबत नोटिसा बजावण्याच्या सूचनादेखील शासनाकडून देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाच्या वतीने तालुका, जिल्हा व शाळा स्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या अडीअडचणी व तक्रारीसाठी या समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पालकांनी शासनाने विहित केलेल्या परिपूर्ण कागदपत्रांसह संबंधित शाळेशी तत्कळ किंवा स्वतः शासनाच्या rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे पार पाडण्यासाठी वेळापत्रक ठरवून दिलेले आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गटशिक्षण अधिकारी मंजुषा साळुखे, तालुक समन्वयक सचिन गुरुळे (मोबा. 8308029100) यांनी केले आहे.

तालुक्यातील पात्र शाळांची यादी याप्रमाणे…
शताब्दी इंग्लिश मीडियम स्कूल-6,पिंकरोज इंग्लिश मीडियम स्कूल, बारागावपिंप्री -3, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल कासारवाडी-5, श्री साईनारायण स्कूल कोनांबे-4, एस. जी. पब्लिक स्कूल सिन्नर -18, एस. के. पब्लिक स्कूल, नायगाव-6, लक्ष्मणगिरीजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूल पांढुर्ली – 5, श्री इंग्लिश मीडियम स्कूल शिवाजीनगर सिन्नर-11, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल सरदवाडी-6, एस. डी. जाधव इंग्लिश मीडियम स्कूल शहा-8, नवजीवन डे स्कूल सिन्नर-16, सिल्व्हर लोट्स इंग्लिश मीडियम स्कूल सिन्नर-10, आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल सिन्नर-29, किड्झ अकॅडमी सिन्नर- 25, प्राथमिक विद्या मंदिर सरदवाडी-17, लक्ष्मणगिरीजी महाराज इंग्लिश मीडियम स्कूल सोनारी-2, गुरुकृपा मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल ठाणगाव-01, इरा किड्झ पब्लिक स्कूल ठाणगाव-7, इरा इंटरनॅशनल स्कूल सिन्नर 15, एस. एस. के. पब्लिक स्कूल वडझिरे-6, आर. पी. गोडगे पाटील पब्लिक स्कूल वावी-6, आर.पी. गोडगे पाटील मराठी स्कूल वावी-7, भाऊसाहेब आव्हाड इंग्लिश मीडियम स्कूल दापूर-3, ब्रेवस इंग्लिश मीडियम स्कूल मोहदरी-3, अभिनव बाल विकास मंदिर नायगाव-14, स्वामी अद्वैतानंद महाराज गुरुकुल सांगवी-1, अभिनव बाल विकास मंदिर वडांगळी-12, स्वामी विवेकनंद प्रायमरी स्कूल विंचूरदळवी 5, सिन्नरभूषण एस. जी. गडाख स्कूल पंचाळे-11, यशदा इंग्लिश मीडियम स्कूल माळेगाव -7, अभिनव बाल विकास मंदिर पांढुर्ली -7 असे एकूण 271.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT