Nandurbar Voter Help Desk
नंदुरबार : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि भारतीय संविधानाच्या कलम 324 अन्वये जिल्ह्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनर्रिक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision-2026) वेगाने राबविण्यात येत आहे.
या मोहिमेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांना घेता यावा आणि त्यांच्या निवडणूक विषयक अडचणींचे त्वरित निवारण व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या ठिकाणी विशेष 'मदत कक्ष' (Help Desk) स्थापन करण्यात आले आहेत.
या मदत कक्षांचे संपर्क क्रमांक प्रशासनाकडून नागरिकांसाठी जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष व संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत:
• जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार (निवडणूक शाखा): 02564-210008
• 01-अक्कलकुवा (तहसील कार्यालय, अक्कलकुवा): 02567-252226
• अक्राणी (तहसील कार्यालय, अक्राणी): 02595-220232
• 02-शहादा (तहसील कार्यालय, शहादा): 9404442441/7666635390
• तळोदा (तहसील कार्यालय, तळोदा): 02567-232367
• 03-नंदुरबार (तहसील कार्यालय, नंदुरबार): 02564-232269
• 04-नवापूर (तहसील कार्यालय, नवापूर): 02569-295282
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये राज्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आणि पारदर्शकतेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आणि तहसीलदार कार्यालयांतर्गत हे मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
मतदार यादी विशेष पुनरिक्षण मोहिमेसंदर्भात माहिती व तक्रारींसाठी नागरिक या कक्षांशी थेट संपर्क साधू शकतात, असेही उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.