Dhule Nandurbar ST bus accident : धुळे नंदुरबार बसला मालवाहू ट्रेलरची जोरदार धडक; चालक गंभीर जखमी

३० ते ४० प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले
Dhule Nandurbar ST bus accident : धुळे नंदुरबार बसला मालवाहू ट्रेलरची जोरदार धडक; चालक गंभीर जखमी
Published on
Updated on

धुळे : शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे गावाजवळ सकाळी सुमारे ८ वाजेच्या सुमारास धुळे नंदुरबार मार्गावरील एसटी बस आणि मालवाहू ट्रेलर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात बस चालक अनिल देवरे यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून बस मधील सुमारे ३० ते ४० प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले. अपघातानंतर ट्रेलर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार MH २० BL २६०० क्रमांकाची धुळे नंदुरबार एसटी बस धुळ्याहून नंदुरबारच्या दिशेने जात असताना चिमठाणे गावाकडून येणाऱ्या MH २१ BH ८९७९ क्रमांकाच्या मालवाहू ट्रेलरने बसला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी झाले. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले. गावकऱ्यांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढत मोठा अनर्थ टाळला. जखमी चालकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर काही काळ परिसरात वाहतूकही विस्कळित झाली होती.

Dhule Nandurbar ST bus accident : धुळे नंदुरबार बसला मालवाहू ट्रेलरची जोरदार धडक; चालक गंभीर जखमी
Mahad Road Accident : महाड-विन्हेरे मार्गावर सततच्या अपघातांमुळे वाढता धोका

चिमठाणे ते सोनगीर या मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र कामाची गती अत्यंत संथ असून अनेक ठिकाणी रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यावर चिखल खड्डे आणि घसरडी परिस्थिती निर्माण होत असल्याने या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याची तक्रार नागरिकांची आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या मार्गावरील धोकादायक परिस्थिती बाबत अनेक वेळा प्रशासन आणि संबंधित बांधकाम विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत.

Dhule Nandurbar ST bus accident : धुळे नंदुरबार बसला मालवाहू ट्रेलरची जोरदार धडक; चालक गंभीर जखमी
Sindhudurg storm news: मध्यरात्री निसर्गाचा कहर; चौकुळच्या म्हार्टवाडी-बेरडकीवर वादळाचा घाला

पत्रकारांनीही या संदर्भात वारंवार प्रश्न उपस्थित केले मात्र आजपर्यंत ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होती आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून वाहतुकीसाठी सुरक्षित व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच या अपघाताची सखोल चौकशी करून फरार ट्रेलर चालका विरोधात कठोर कारवाईची मागणी ही करण्यात आली आहे. वारंवार होणाऱ्या जीवघेण्या अपघात रोखण्यासाठी प्रशासन काय उपाययोजना करते यावर सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news