उत्तर महाराष्ट्र

मंत्री गुलाबराव पाटील : पक्षविरहित काम करतोय, कुणावरही आरोप करण्याचा हेतू नाही

गणेश सोनवणे

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : भुसावळ शहरातील 6. 22 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी पाटील यांनी भुसावळ शहराच्या विकासासाठी विविध कामांसाठी 57 कोटी रुपयांचा निधी दिल्याचे सांगितले. यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, खराब रस्ते चांगले करण्याचे काम हाती घेतले, यात कोणावरही आरोप करण्याचा हेतू माझा नाही. नगरपालिका व स्थानिक नेत्यांनी मागणी केली होती. पक्षविरहित काम करण्याचा माझा प्रयत्न मी केला असल्याचे पाटील म्हणाले.

भुसावळ नगरपालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय सावकारे, प्रशासक रामसिंग सुलाने, मुख्याधिकारी संदीप चीद्रवार यांच्यासह आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार सावकारे म्हणाले,  भुसावळ शहराचा विकास 20 ते 25 वर्ष मागे गेलेला आहे.  विकासाच्या नावावर शहरांमध्ये काहीच बदल झालेला दिसत नाही. विकासाच्या बाबतीत भुसावळ शहर हे इतर शहरांपेक्षा मागे पडले आहे. त्यामुळे डोक्यातून पक्ष वगैरे सर्व बाजूला ठेवून विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी उपस्थितांना केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT