file photo  
उत्तर महाराष्ट्र

कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर बलात्कार करून केला खुन

अमृता चौगुले

इगतपुरी, पुढारी वृत्‍तसेवा : इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथील विश्राम गृहाच्या बाजुला असलेल्या खदाणीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी सकाळी घडली. एक महिला नेहमी प्रमाणे कपडे धुण्यासाठी गेली होती. याच वेळी येथे दबा धरून बसलेल्या काही इसमांनी या महिले सोबत झटापटी करून खोल दरीत नेऊन बलात्कार करून नंतर तिचा खून केला.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, कपडे धुण्यासाठी गेलेली महिला बराच वेळेपासून घरी परतली नाही. यानंतर तीला शोधण्यासाठी काही जण खदाणीकडे गेले असता त्‍यांना ती मृत अवस्‍थेत आढळून आली. यानंतर नागरीकांना तेथेच एक इसम मिळुन आल्याने त्याला पकडुन घोटी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

दरम्‍यान, या घटनेत तीन ते चार संशयित इसम आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली असून बाकी आरोपी फरार झाले आहेत. या घटनेने इगतपुरी तालुक्यात खळबळ माजली आहे.

नागरिकांनी या घटनेची माहिती घोटी पोलीसांनी दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्‍थळी पोहचले. परिसरातील संतप्त जमावाने पोलीस ठाण्यात दाखल होत संबंधित आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली. तसेच या ठिकाणी गावठी दारूचा धंदा सुरू होता. हा दारुचा धंदा बंद करावा यासाठी खंबाळे ग्रामपंचायतीने वेळोवेळी मागणी केली होती मात्र हा धंदा बंद झाला नाही. तसेच खंबाळे येथे सार्वजनिक बांधकाम विश्रामगृह मद्यपींचा अड्डाच बनला आहे. येथे दिवसभर मद्यधुंद अवस्थेत मद्यपी वावरतांना दिसतात. मात्र याकडे कोणाचाच अंकुश नसल्याने हा प्रकार वाढतच चालला आहे. याच विश्रामगृहाच्या बाजुला असलेल्या खदाणीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. तसेच घोटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप खेडकर यांची तातडीने निलंबित करण्याची मागणी नागरिकांनी केली.

या घटनेतील सर्व आरोपींना जेरबंद करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. पुढील काही दिवसात खेडकर यांची बदली करण्यात येईल असे आश्वासन पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांनी दिले. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

.हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT