जळगाव: अजनाड येथील एका महिलेने गावातीलच अनेक महिलांच्या नावावर बोगस बचत गट स्थापन करून सरकारी आणि खाजगी बँकांमधून तब्बल ६० ते ६५ लाख रुपयांचे कर्ज उचलून त्यांची फसवणूक केली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रावेर तालुक्यातील अजनाड गावात राहणाऱ्या एका महिलेने गावातीलच महिलांशी मैत्रीचे संबंध निर्माण केले. सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आणि आर्थिक मदत करण्याचे आमिष दाखवून तिने अनेक महिलांकडून त्यांचे आधार कार्ड, फोटो आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे गोळा केली. या कागदपत्रांच्या आधारे तिने महिलांना अंधारात ठेवून त्यांच्या नावे बनावट महिला बचत गट तयार केले.
या बोगस गटांच्या नावावर तिने विविध सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये कर्जासाठी अर्ज केले. बँकांच्या अधिकाऱ्यांचीही दिशाभूल करून तिने तब्बल ६० ते ६५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. कर्जाची रक्कम स्वतःच्या खात्यात वळवून ती फरार झाली.
काही महिन्यांनंतर, ज्या महिलांच्या नावे कर्ज घेण्यात आले होते, त्यांच्या घरी बँकांचे वसुली अधिकारी कर्जाच्या हप्त्यांसाठी येऊ लागले. आपण कोणतेही कर्ज घेतले नसताना आपल्या घरी वसुलीसाठी माणसे का येत आहेत, हे पाहून महिलांना धक्काच बसला. त्यांनी चौकशी केली असता, आपल्या नावावर बचत गटाच्या माध्यमातून लाखो रुपयांचे कर्ज उचलल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलांनी एकत्र येऊन रावेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.
या घटनेने ग्रामीण भागातील विश्वासाच्या नात्यालाच तडा गेला आहे. एकाच गावात राहणाऱ्या, एकमेकींना ओळखणाऱ्या महिलेनेच फसवणूक केल्याने पीडित महिला हवालदिल झाल्या आहेत. "आमच्याच ओळखीच्या बाईने असा विश्वासघात केला, यावर आमचा विश्वासच बसत नाही. मदतीच्या नावाखाली तिने आमचा संसारच रस्त्यावर आणला," अशी संतप्त प्रतिक्रिया एका पीडित महिलेने दिली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रावेर तालुक्यातील अजनाड येथे राहणाऱ्या व हल्ली मुक्काम वाल्मिक नगर घेण्याबाबत रावेर येथे राहत असलेल्या रूपाली मुकेश तायडे हिने फिर्यादी प्रतिभा राजेंद्र पाटील हिच्या गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा खानापूर येथील महिलांचे बचत गट १) जय बजरंग महिला स्वयंसहायता समूह अजनाड बचत गट, २) मल्हार महिला महिला स्वयंसहायता समूह अजनाड बचत गट, ३) साई महिला महिला स्वयंसहायता समूह अजनाड बचत गट, ४) जनजननी महिला स्वयंसहायता समूह अजनाड बचत गट, ५) शिव महिला स्वयंसहायता समूह अजनाड बचत गट, ६) जयदुर्गा महिला स्वयंसहायता समूह अजनाड बचत गट, ७) महादेव महिला स्वयंसहायता समूह अजनाड बचत गट, ८) श्रीकृष्ण महिला स्वयंसहायता समूह अजनाड बचत गट, ९) आंबेडकर महिला स्वयंसहायता समूह अजनाड बचत गट, १०) सार्थक महिला स्वयंसहायता समूह अजनाड बचत गट, ११) भिमाई महिला स्वयंसहायता समूह अजनाड बचत गट व १२) एकविरा महिला स्वयंसहायता समूह अजनाड बचत गट यांच्या बचतगटाची मिळून एकुण २४,८२,५०० रुपये व खाजगी बँकेतील लोन धारक महिला नामे १) ऊषा जगदीश कोळी,२) प्रतिभा राजेंद्र पाटील, ३) पुजा विनोद कोळी, ४) ऊषा सिताराम कोळी, ५) सरला शांतीलाल कोळी,६) मंजूराबाई गोपाळ कोळी, ७) शारदा जितेंद्र कोळी, ८) वंदना रविंद्र रायमळे, ९) मंगलाबाई मदन कोळी, १०) शितल नितिन कोळी, ११) लक्ष्मी संतोष तायडे, १२) वराबाई सदाशिव कोळी, १३) नथ्थु सुनिताबाई गाढे, १४) वंदना सुनिल टोकरे, १५) सुरेखा भगवान कोळी, १६) पुनम जिवन धनगर, १७) मुक्ता निलेश धनगर, १८) आशा नारायण कोळी, १९) सरला प्रकाश चौधरी, २०) अर्चना सुनिल चौधरी, २१) प्रिंयका वैभव चौधरी, २२) वंदना नारायण चौधरी, २३) मंगला अजय गाढे, २४) मनिषा हरी कोळी, २५) प्रतिभा अरूण गाढे, २६) निशा सुनिल अटकाळे, २७) गायत्री विश्वास कोळी, २८) रंजना राजु भोई, २९) संगिता कैलास गाढे, ३०) शोभाबाई फकीरा तायडे, ३१) रत्नाबाई संजय भोई, ३२) प्रमिला युवराज तायडे, ३३) बबिता कैलास कोचुरे, ३४) इंदूबाई दिलीप गाढे, ३५) शोभा अशोक महाजन, ३६) दुर्गा अतुल महाजन, ३७) अनिता विनोद महाजन, ३८) निर्मला संदीप धनगर, ३९) मंगलाबाई बाळु कोळी व इतर काही महिला सर्व रा. अजनाड, ता. रावेर, जि.जळगाव यांची एकुण सुमारे ६० ते ६५ लाख रूपयांची फसवणुक केलेली आहे. याप्रकरणी प्रतिभा राजेंद्र पाटील राहणार अजनाड तिने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात रूपाली मुकेश तायडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.