जळगाव : दादांना अनावश्यक या प्रकरणात गुंतवण्याची प्रक्रिया होत आहे. दादांची काम करण्याची पद्धत संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे दादा असे काम करणार नाही. राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे दोष नसताना कोणालाही किंवा कोणावरी शिंतोडे उडवणार का ? असा प्रश्न माध्यमांशी बोलताना माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी उपस्थित केला. ते आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या भुसावळ व जळगाव लोकसभेच्या विधानसभा क्षेत्रावरील मुलाखती घेण्यासाठी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.
यापुढे माध्यमांशी बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आढावा घेतलेला आहे. पदाधिकारी या ठिकाणी युतीचा निर्णय घेतील उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित दादा यांचे नाव अनावश्यक या प्रकरणात गुंतवण्याची प्रक्रिया होत आहे. ते असे कधीच काम करीत नाही आरोप कोणी केल्या आरोप सिद्ध झाले आहे का ते चौकशीला समोरी जातील असे आम्ही जाहीरपणे सांगतोय. त्यांची चौकशी होत नाही तोपर्यंत राजीनामा कशाला दोषी नसताना कोणावर शिंतोडे उडवणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
त्यांच्याशी किंवा ज्यांना ज्यांना युती करायचे त्यांच्याशी युती करू ज्यांना युती करायची नाही किंवा नसेल त्यांच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आमची आहे. व स्वतंत्र लढू आम्ही युती कोणाची ही करू समोरील प्रस्ताव तो मान्य असल्याशिवाय युती होणार नाही असे माणिकराव कोकाटे यावेळी म्हणाले.